By  
on  

दोस्तानाच्या सिक्वलसाठी आलियाचं नाव फायनल?

करण जोहरचा सुपरहिट सिनेमा 'दोस्ताना' तुम्हाला आठवतोय ना? अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम या जोडीने प्रियांका चोप्रासोबत काय धम्माल केली होती. या रोमॅंटीक कॉमेडी सिनेमाचा सिक्वल येतोय हे पण आपल्याला माहिती आहे. पण या सिक्वलसाठी करण नव्या कलाकारांच्या शोधात आहे. अभिनेत्यांच्या जोडीसोबतच करणला या सिनेमात नवीन अभिनेत्रीलासुध्दा कास्ट करायचं आहे. पण आता सूत्रांच्या माहितीनुसार,या सिनेमात आलिया भटच्या नावावर नायिका म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

'दोस्ताना' सिक्वल संदर्भातील जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आलियासोबत या सिनेमा बाबत चर्चा झाली असून तिला सिनेमाची कॉन्सेप्ट आवडल्याचे समजते. तसंच ती लवकरच फायनल स्क्रीप्ट वाचून पुढील बाबी स्पष्ट करणार आहे. अद्याप सिनेमासाठी दोन प्रमुख नायकांची निवड बाकी आहे. ती पूर्ण झाल्यावरच करण जोहर सिनेमाची घोषणा करणार असल्याचे समजते. या सिनेमाचं प्री- प्रोडक्शनचं काम सध्या सुरु आहे.

दरम्यान, आलियाकडे बाहुबली फेम दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या आगामी तेलुगू सिनेमाची ऑफर आहे आणि खुद्द आलियासुध्दा यासाठी बरीच उत्सुक आहे. त्यामुळे आता सूत्रांनुसार आलिया आपल्या तारखांची जुळवा-जुळव करण्यात दंग झाली आहे. असणारच ना, हातातले चांगले प्रोजेक्ट्स कोण सोडेल म्हणा.

Recommended

PeepingMoon Exclusive