By  
on  

तुषार कपूरनंतर आता एकता कपूरने घेतला सरोगसीचा आधार, मुलाला दिला जन्म

अभिनेता तुषार कपूर हा सरोगसीद्वारे वडील झाल्यानंतर आता त्याची बहिण प्रसिध्द टीव्ही निर्माती एकता कपूर हिने सरोगसीचा आधार घेतला आहे. त्यामुळे तुषार कपूरचा मुलगा लक्ष नंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.  एकता कपूरनेही लग्न न करता सरोगसीद्वारे मुलाल जन्म दिला आहे. 27 जानेवारीला एकताच्या मुलाचा जन्म झाला असून तो एकदम स्वस्थ आहे आणि लवकरच तो एकताच्या घरी येईल.

काही दिवसांपूर्वी एकताने लग्न न करता आई बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. बाळाची जबाबदारी उचलण्यास मी एकदम तयार आहे असं तिने स्पष्ट केलं होतं.

Recommended

PeepingMoon Exclusive