By  
on  

बॉलिवूडची क्वीन कंगना राणावत एंजॉय करतीये सुट्ट्या, व्हिडिओ झाला व्हायरल

मणिकर्णिकाचं यश कंगनासाठी सुखावणार ठरलं आहे. या सिनेमाशी संबंधित रोज एक नवा वाद समोर येत असला तरी प्रत्यक्षात कंगनाने मात्र यावर भाष्य करणं टाळलं आहे.

मणिकर्णिकाचा वाद आणि शूटिंगचा थकवा यांच्यापासून दूर जाऊन निवांतपणा अनुभवण्यासाठी कंगनाने आल्पस पर्वतराजीची निवड केली आहे. कंगना सध्या स्वित्झर्लंड्मध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. यावेळी तिचा स्किइंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कंगनाची बहीण रंगोलीने हा व्हिडिओ सर्वप्रथम व्हायरल केला. या ट्वीट्च्या माध्यमातून रंगोलीने कंगनाच्या टीकाकाराना चोख उत्तर दिलं आहे.

https://twitter.com/Rangoli_A/status/1090617895737085953

मणिकर्णिका हा सिनेमा २५ जानेवारीला रिलीज झाला होता. तेव्हापासून या सिनेमासंबंधी रोज एक नवीन वाद समोर येत आहे. कंगनाच्या बाजूने तिची बहीण रंगोली मैदानात उतरली आहे. पण कंगनाने मात्र अजून यावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली दिसून येत नाही.

https://www.instagram.com/p/BtQzIdnne48/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive