By  
on  

सुर्यवंशीच्या तयारीसाठी रोहीत आणि टीम निघाली गोव्याला, शेअर केला फोटो

सिंबाच्या यशाच्या जोर ओसरतोय न ओसरतो तोच रोहीतने पुढच्या सिनेमाची तयारी सुरु केली आहे. रोहीतचा आगामी सिनेमा आहे सुर्यवंशी. सुर्यवंशी हा देखील पोलिसपट आहे. या सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असणार आहे. सिंबामध्ये कॅमिओ करायला लावून अक्षय आपल्या पुढच्या सिनेमाचा हिरो असणार हे रोहीतने प्रेक्षकांना सांगितलं होतं.

रोहीत स्क्रिप्टवर काम करण्यासाठी आणि लोकेशन ठरवण्यासाठी सुर्यवंशीची सगळी टीम गोव्याला रवाना झाली आहे. रोहीतने या प्रवासाचा फोटो पोस्ट करत कॅप्शन दिलं आहे की मिशन सुर्यवंशी, गोव्याच्या वाटेवर. सिनेमाच6 लोकेशन म्हणून गोवा हे रोहीत शेट्टीची पहिली पसंती राहिली आहे. त्यामुळे आता सूर्यवंशीची पार्श्वभूमी गोव्याची असेल तर नवल वाटायला नको.

https://www.instagram.com/p/BtVzOHkhNa9/?utm_source=ig_web_copy_link

 

Recommended

PeepingMoon Exclusive