By  
on  

स्थूल म्हणून हिणवणा-यांना नेहा धुपियाने दिलं सडेतोड उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने अभिनेता अंगद बेदीसह विवाह केल्यानंतर नुकतंच काही महिन्यांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला. यामुळ े संपूर्ण धुपिया आणि बेदी परिवार प्रचंड आनंदात आहे. या चिमुकलीचं नाव मेहेर असं ठेवण्यात आलं आहे. मुलीच्या जन्मानंतर काहीच महिन्यात नेहाने मात्र आपल्या उर्वरीत प्रोजेक्ट्सवर काम पुन्हा सुरु केल आहे. यानिमित्त ती अनेकदा स्पॉट होते.

पण प्रेग्नेन्सी आणि डिलीव्हरीनंतर नेहाचं बरंच वजन वाढलं आहे. त्यामुळे ती जेव्हा प्रसिध्दी माध्यमांसमोर येते तेव्हा ते सहज दिसून येतं. याच दरम्यान एका वेबसाईटने नेहा धुपियाच्या या वाढलेल्या वजनासंदर्भात काही कमेंट केली आणि हे जेव्हा नेहाला समजलं तेव्हा मॅडमचा पारा भलताच चढला. तिने या वेबसाईटला चांगलंच धारेवर धरलं.

नेहाने ट्विट करत या वेबसाईटला चोख प्रत्युत्तर देत म्हटलं, "या स्थूलपणामुळे मी अजिबातच संकोचित झालेली नाही. यांसारख्या गोष्टींमुळे फक्त सेलिब्रिटींनाच नाही तर सामान्यांनासुध्दा हिणवणं बंद झालं पाहिजे. फिटनेस हे जरी प्राथमिक असलं तरी समाजाच्या दृष्टीने कोणी कोणत्या लूकमध्ये दिसावं हे ठरवलं जाऊ नये. कोणावरही कुठलीही कमेंट करताना प्रथम विचार जरुर करावा."

https://twitter.com/NehaDhupia/status/1091534183976103937

Recommended

PeepingMoon Exclusive