By  
on  

Exclusive: अभिनेता इरफान खान परतणार, सध्या या दवाखान्यात आहेत उपचार सुरु

आज जागतिक कॅन्सर दिनाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता इरफान खानच्या चाहत्यांसाठी खास बातमी आहे. इरफानचा परदेशातील उपचार संपला असून तो भारतात परतला आहे. इरफानला न्युरोएण्डोक्रान्युरोएण्डोक्राईन कॅन्सरची लागण झाली होती. दुर्मिळ असलेल्या या कॅन्सरवर इरफान परदेशी उपचार घेत होता. पण आता परदेशातील उपचार संपले असून इरफान अंतिम टप्प्यातील उपचार कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये घेत आहे.

इरफानची प्रकृती सुधारली असून तो आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. इरफान साधारणत: डिसेंबरच्या सुमारास शुटिंगवर परतेल असं पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीवरून समजतं. तो सर्वप्रथम जयपूर जवळील त्याच्या टोंक या गावी जाईल. त्यानंतर तो हिंदी मिडियम २च्या शुटिंगला सुरुवात करेल. इरफान प्रमाणेच मनीषा कोईराला, राकेश रोशन, सोनाली बेंद्रे यांनीही कॅन्सरशी दोन दोन हात केले आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive