By  
on  

अभिनेत्री शिल्पा शिंदेचा राजकारणात प्रवेश; कॉंग्रेसकडून निवडणूक लढवण्याची शक्यता

छोट्या पडद्यावरील भाभीजी म्हणून प्रसिध्द असलेली आणि बिग बॉस 11 या शोची विजेती अभिनेत्री शिल्पा शिंदे लवकरच राजकारणात प्रवेश करतेय. शिल्पा शिंदे कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. परंतु शिल्पा कडून अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.

परंतु विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी शिल्पाला पक्षाची सदस्यत्त्वता दिली आहे. आणि लवकरच पक्षातर्फे तिला मुंबईतून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कृष्णा अभिषेक नंतर आता शिल्पा राजकारणात येतेय. असंच म्हणावं लागेल. आजकाल सेलिब्रिटींना राजकारणाकडे वळताना ब-याचदा पाहायला मिळतंय. त्यांच्या प्रसिध्दीचा त्या त्या पक्षाला मतं मिळवून देण्यास व ती जागा जिंकण्यास खुप मोठा उपयोग होतो, हे त्यामागचं सर्वात मोठं कारण आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ह्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे.

शिल्पाची भाभीजी घर पर है मालिकेतील अंगूरी भाभी ही व्यक्तिरेखा प्रचंड गाजली होती.

Recommended

PeepingMoon Exclusive