By  
on  

स्वत:च्या या सिनेमातील गाण्यावर सुश्मिता सेनने केला डान्स, चाहत्यांनी जागवल्या आठवणी

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनने अलीकडेच दिल्लीमधील एका घरगुती समारंभात जोरदार नृत्य केलं. सुष्मिताने तिच्या बीबी नं.-१ सिनेमातील गाण्यावर घरातील सदस्यासह नृत्य केलं. त्यापूर्वी सुष्मिता बॉयफ्रेंड रोहमन शॉल आणि दोन मुलींसोबत एअरपोर्टवर दिसली होती. लग्नघरात दाखल झाल्यापासून सुश्मिता स्वत:मधील उत्साह लपवू शकली नाही. यावेळी तिने बीबी नं-१ मधील ‘चुनरी चुनरी’ या गाण्यावर नृत्य केलं. हा व्हिडिओ तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ९०च्या दशकातील या गाण्यात सलमान आणि सुश्मिता एकत्र दिसले होते. चाहत्यांनी हे गाणं रिक्रिएट करावं अशी मागणीही कमेंटमधून केली आहे.

https://www.instagram.com/p/BteGPOtBcNp/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive