मादाम तुसादमध्ये प्रियांका चोप्राने रचला हा इतिहास

By  
on  

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आत्ता ग्लोबल स्टार आहे, हे काही तुम्हाला वेगळं सांगण्याची अजिबात गरज नाही. पण या देसी गर्लने आता आणखी एक विक्रम रचला आहे. न्यूयॉर्क येथील मादाम तुसाद संग्रालयात जगभरातील सेलिब्रिटींचे मेणाचे पुतळे आहेत आणि त्यात आपल्या बॉलिवूड सेलिब्रिटींचाही तितकाच सहभाग आहे हे आपण जाणतोच. पण आता या देसी गर्लच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली आहे.

प्रियांका मादाम तुसादच्या चार संग्रहालयात जागा मिळवणारी पहिली ग्लोबल सेलिब्रिटी ठरलीआहे. आत्तापर्यंत केवळ अमेरिकन गायिका व अभिनेत्री व्हिटनी ह्युस्टन एक अशी सेलिब्रिटी होती, जिचे मादाम तुसादच्या तीन संग्रहालयात मेणाचे पुतळे होते. त्यानंतर आता प्रियांका ह्याची मानकरी ठरली आहे. लवकरच लंडन, सिडनी आणि आशियातही तिचा मेणाचा पुतळा उभारण्यात येणार आहे.

https://www.instagram.com/p/BtlqDxzg1Le/?utm_source=ig_embed

प्रियांकाने नुकतीच मादाम तुसाद या संग्रहालयाला भेट दिली आणि स्वत:च्या पुतळ्यांना पाहून हरखून गेली. त्यावेळी त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह ती अजिबातच आवरु शकली नाही. हे सर्व फोटो आणि व्हिडीओ खुद्द तिनेच आपल्या सोशल अकाउंटवर चाहत्यांसोबत शेअर केले.  डिसेंबर 2018 साली प्रियांका अमेरिकन पॉप सिंगर निक जोनाससोबत शाही पध्दतीने भारतात विवाहबध्द झाली. त्यानंतर तर तिच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली.

टीव्ही सीरिज ‘क्वांटिको’मधून प्रियांकाने हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि मग तिथेच ती जास्त रमू लागली. यानंतर बेवॉच, अ किड लाईक जेक अशा हॉलिवूडपटात ती झळकली. लवकरच तिचा ‘इजन्ट इट रोमॅन्टिक’ हा हॉलिवूड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. याशिवाय फरहान अख्तरच्या द स्काय इज पिंक या बॉलिवूड सिनेमातसुध्दा झळकणार आहे.

https://www.instagram.com/p/Btlm9rUH49w/?utm_source=ig_embed

Recommended

Loading...
Share