By  
on  

'पॅडमॅन'च्या वर्षपूर्ती निमित्त अक्षयने शेअर केली ही पोस्ट

ज्वलंत असो वा संवेदनशील कुठलाही विषय जनमानसात पोहचवण्याचं प्रभावी माध्यम असतं सिनेमा. बॉलिवूडमध्ये आजवर अनेक सिनेमे आले. पण ह्यात वर्षभरापूर्वी आलेल्या अक्षय कुमार आणि सोनम कपूर स्टारर 'पॅडमॅन'चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. मासिक पाळी आणि त्या दरम्यान स्वच्छतेसाठी पॅडची अत्यावश्यकता आजही खेड्यापाड्यातील महिलांना पटवून द्यावी लागते व हाच संदेश या सिनेमाने सर्वांपर्यंत सहज हलक्या-फुलक्या पध्दतीने पटवून दिला.

'पॅडमॅन' सिनेमाच्या वर्षपूर्तीनिमित्त अक्षय कुमारने सोशल मिडीयावर एक पोस्ट आज शेअर केली. "या सिनेमाने मला माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढण्यास भाग पाडलं. मला अशाप्रकारचा सिनेमा करायला आवडेल  जर तो मासिक पाळी आणि स्वच्छता या संवेदनशील विषयाला लोकांपर्यंत पोहचवण्यास हातभार लावणार असेल"

https://www.instagram.com/p/Btpk-P9H9qw/?utm_source=ig_embed

खरे पॅडमॅन मुरुगनांथम यांनी खेड्यापाड्यात माफक दरात महिलांना सॅनिटरी पॅड उपलब्ध करण्याचं काम केलं. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना 2016 साली पद्ममश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांच्याच जीवनावर हा सिनेमा आधारित आहे.

अक्षय कुमारची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने पॅडमॅन  या सिनेमाची धुरा सांभाळली होती. प्रेक्षकांची मनं जिंकण्याबरोबरच या सिनेमाने बॉक्स ऑफीसवरही बक्कळ कमाई केली.

Recommended

PeepingMoon Exclusive