By  
on  

मणिकर्णिका सिनेमाबाबत अनुपम खेर यांनी या शब्दात केलं कंगनाचं कौतुक

क्वीन कंगना राणावत काही दिवसांपुर्वी बॉलिवूडकरांवर चांगलीच भडकली होती. तिच्या मणिकर्णिका: क्वीन ऑफ़ झांसी सिनेमाचं एकाही बॉलिवूड स्टारने कौतुक न केल्याने ती रागावली होती. पण आता मात्र तिचा राग निवळण्याची चिन्ह आहेत. कारण अलीकडेच अभिनेता अनुपम खेर यांनी कंगनाचं ट्वीट करून कौतुक केलं आहे.
अनुपम आपल्या ट्वीट्मध्ये म्हणतात. ‘कंगना खरी रॉकस्टार आहे. तिच्या अभिनय कौशल्याची आणि धाडसाची मी दाद देतो. महिला सशक्तीकरणाचं कंगना उत्तम उदाहरण आहे.

https://twitter.com/AnupamPKher/status/1094047232222027778

मणिकर्णिकाच्या प्रिमिअरला कोणताही बॉलिवूड स्टार बोलावूनही न आल्याने कंगनाने चांगलच तोंडसुख घेतलं होतं. त्यानंतर मणिकर्णिकाने इतका चांगला बिझिनेस करूनही कोणीही तिचं अभिनंदन देखील केलं नव्हतं. पण अनुपम खेर यांच्या ट्वीटनंनंतर या वादावर पडदा पडला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive