Kesari glimps: ज्वाळांनी घेरलेल्या ईशर सिंहला पाहिलं का, 'केसरी'तून दिसलं देशप्रेम

By  
on  

अ‍क्षय कुमारचा नवा सिनेमा केसरी रसिकांच्या भेटीला सिद्ध झाला आहे. या सिनेमातील काही क्षण अक्षयने तीन पार्टमध्ये फॅन्ससोबत शेअर केले आहेत. यातील पहिल्या पार्ट्मध्ये अक्षय तळपत्या तलवारीसहित अफगाणी शत्रुचा समाचार घेताना दिसत आहे.

तर या सिनेमाच्या दुस-या व्हिडिओमध्ये अफगाणी सैनिकासमोर हवालदार ईशरसिंह अर्थात अक्षयकुमार अंगाभोवती ज्वाळा लपटेलेल्या असतानाही निडरपणे उभा असल्याचं दिसून येत आहे. अक्षयचा धगधगता अवतार पाहून अफगाणी सैनिकांच्या चेह-यावरील भय स्पष्टपणे दिसून येत आहे. २ सेकंदाचा हा व्हिडिओ तुम्हाला ईशरसिंगच्या धाडसी स्वभावाचा प्रत्यय देईल यात शंका नाही. या व्हिडिओला Glimpses of Kesari – Part 2 असं नाव दिलं गेलं आहे.

हा सिनेमा अनुराग सिंह दिग्दर्शित करत आहे. हा सिनेमा त्यांचा पहिलाच सिनेमा आहे. करण जोहर, अपूर्व मेहता, अरूणा भाटिया आणि हीरू जोहर हे या सिनेमाचे निर्माते आहेत. सिनेमात अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा १८९७च्या सारागढीच्या लढाईवर बेतलेला आहे. यामध्ये २१ शीख सैनिकांनी १०,००० अफगाणी सैनिकांना पाणी पाजलं होतं.

https://www.youtube.com/watch?time_continue=13&v=q9In6sxMFDA

Glimpses of Kesari – Part ३ मध्ये व्हिडिओच्या सुरुवातीलाच २१ शिख १०,००० सैनिकांसमोर उभे ठाकलेले दिसत आहेत. संख्येने शत्रुसैन्यापेक्षा कमी असूनही ईशर सिंगच्या चेह-यावर भितीचा लवलेशही दिसून येत नाही. मुंग्यांसारखे दिसणारं अफगाण सैन्य पुढे सरकताच ईशर सहका-यांना गोळी चालवण्याची आज्ञा देतो हे या व्हिडिओमधून दिसून येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर २१ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. हा सिनेमा १ मार्चला रसिकांच्या भेटीला येणार आहे.

https://www.youtube.com/watch?time_continue=5&v=R4h4Wcz-GtI

Recommended

Loading...
Share