Photo: कुणी येणार गं! प्रियांका चोप्रा जोनास प्रेग्नेंट आहे की त्या फक्त अफवाच

By  
on  

बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवल्यानंतर आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने हॉलिवूडमध्येसुध्दा आपलं विशेष स्थान निर्माण करणारी ग्लोबल सेलिब्रिटी प्रियांका चोप्रा जोनासकडे लवकरच छोटा पाहुणा येणार असल्याची नेटक-यांना कुणकुण लागली आहे. निकसोबत भारतात शाही पध्दतीने विवाहबंधनात अडकल्यानंतर प्रियांकाला लग्न चांगलंच मानवलेलं दिसतंय. कारण नुकतेच प्रियांकाचे व्हायरल होत असलेले हे फोटो नेमकं काय सांगतायत ते ठरवणं कठीण होऊन बसलंय.

न्यूयॉर्क फॅशन वीकमधील प्रियांकाचे फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोत प्रियांका ब्लॅक टॉप आणि ग्रे स्कर्टमध्ये दिसतेय. परंतु यात तिचं पोट थोडंसं बाहेर आल्याचं पाहायला मिळतंय आणि चेह-यावरील आनंद ओसंडून वाहतोय. यावरुनच मग प्रियांका लवकरच गोड बातमी देणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. जरासं काही कारण मिळालं की सोशल मिडीयावर उलट-सुलट चर्चा होतात त्यामुळे अद्यापतरी आपण या वृत्ताला दुजोरा देऊ शकत नाही.

https://www.instagram.com/p/Bt3uovigXaY/?utm_source=ig_embed

काही दिवसांपूर्वी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत प्रियांका म्हणाली होती, "लग्नानंतर आम्ही दोघं जसं एकमेकांना प्राधान्य देतो. तसं आम्हाला हेसुध्दा माहितीय की मूल होणं हेसुध्दा दाम्पत्य जीवनातील महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. मी आणि निक एकमेकांसोबत आमच्या कामावरसुध्दा प्रेम करतो. मला आई व्हायला आवडेल.आम्हाला मुलंसुध्दा खुप आवडतात. पण आम्ही याबाबत अजून काहीचं ठरवलेलं नाही.

https://www.instagram.com/p/BtgQTedn2cq/

https://www.instagram.com/p/BpfjQJinCTD/

Recommended

Loading...
Share