By  
on  

‘क्वीन’ सिनेमाच्या कथेबद्दल कंगनाने पहिल्यांदाच मांडलं मत, पाहा काय म्हणते कंगना

विकास बहल दिग्दर्शित ‘क्वीन’ हा सिनेमा कंगना राणावतच्या आयुष्यातील माईलस्टोन ठरला. या सिनेमाने कंगनाला ख-या अर्थाने स्टार केलं. समीक्षक आणि जनता अशा दोघांचं प्रेम कंगनाला यामुळे अनुभवता आलं. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शनही उत्तम होतं.

या सिनेमासाठी कंगनाला त्यावर्षीचा राष्ट्रीय पुरस्कारदेखील जाहीर झाला होता. पण तूम्हाला माहीत आहे का या सिनेमाची स्क्रिप्ट वाचल्यानंतर कंगनाला ती अजिबात आवडली नव्हती. उलट कंगनाला ती स्क्रिप्ट काहीशी वीक वाटली होती. यावर कंगना म्हणते, ‘केवळ मीच नाही तर या सिनेमाकडून कुणालाच काही अपेक्षा नव्हती’. पण या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली. शुटिंगच्यावेळचा एक किस्साही कंगनाने सांगितला, ‘’या सिनेमाचं शुटिंग करणं म्हणजे एक पार्टी साजरी करण्यासारखंच होतं. दिग्दर्शकाने सांगितलं की कंगना ताण न घेता निवांतपणे तुझं काम कर’. कंगनाने हे म्हणणं मनावर घेतलं आणि सिनेमाने यशोशिखर गाठलं.

Recommended

PeepingMoon Exclusive