By  
on  

अभिनेत्री जरीना वहाब यांना मिळाली ही महत्त्वाची भूमिका, ट्वीट करून केलं जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकची निर्मितीआधी चर्चा सुरु आहे. या सिनेमात कोणती व्यक्तिरेखा कोण साकारणार याबद्दल रसिकांमध्ये उत्सुकता आहे. नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्ये अभिनेत्री बरखा बिश्त ही मोदींच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जात आहे. पण मोदींच्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे मोदींच्या माताजींची भुमिका कोण साकारणार याबाबत प्रत्येकालाच उत्सुकता होती.

मोदीच्या बायोपिकमध्ये माताजींच्या भूमिकेसाठी अभिनेत्री जरीना वहाब यांची निवड झाली आहे. जरीना आणि आतापर्यंत तेलुगु, तमिळ, मल्याळम सिनेमात काम केलं आहे. अभिनेता सुरज पांचोलीची आई अशीही जरीना यांची ओळख आहे. हिंदीतील चितचोर या सिनेमातील अभिनयामुळे जरीना यांना ओळख मिळाली.

मोदींच्या बायोपिकमध्ये बोमन इराणी आणि दर्शन कुमार यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन ओमंग कुमार करत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive