By  
on  

पुलवामा हल्ल्यातील शहिदांसाठी ‘टोटल धमाल’च्या टीमने घेतला हा मोठा निर्णय

पुलवामा हल्ल्यातील शहिद जवानांच्या कुटुंबियांसाठी आज देशभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. यावेळी बॉलिवूडकर कसे मागे राहतील. त्यामुळे बॉलिवूडमधूनही या कुटुंबियांसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. नुकतीच टोटल धमालच्या टीमनेही या कुटुंबियांना मदत केली आहे. ‘टोटल धमाल’च्या टीमने शहिद जवानांच्या टीमला जवळपास ५० लाख रुपयांची मदत केली आहे. तरन आदर्श यांनी केलेल्या ट्वीटमधून ही बाब समोर आली आहे.

https://twitter.com/taran_adarsh/status/1097346455944159232

बॉलिवूडमधील कलाकार, क्रिकेटर्स यांनीही या कुटुंबियांना मदत देण्याचं जाहीर केलं आहे. कुणी शहिदांच्या मुलांची जबाबदारी घेतली आहे तर कुणी निधीच्या स्वरुपात मदत केली आहे. अमिताभ बच्चन यांनी ५ लाख रुपयांची मदत करण्याचं जाहीर केलं आहे. तर सलमान खान, उरीच्या टीमनेही मदत केली आहे. अक्षय कुमारनेही जवळपास पाच कोटी रुपयांची मदत दिल्याचं समोर आलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive