By  
on  

सपना चौधरीला लाखोंचा गंडा घालून आयोजक फरार

सपना चौधरी हे नाव आज कुठल्याही सेलिब्रटीपेक्षा कमी नाही. माजी बिग बॉस स्पर्धक सपना चौधरीच्या डान्सचे जलवे आणि तिच्या अदा पाहण्यासाठी प्रेक्षक अक्षरश: सैराट होतात. अनेक इव्हेंट्समध्ये सपनाच्या डान्स परफॉर्मन्सला खास मागणी असते. परंतु एका इव्हेंटसाठी लुधियानाला गेलेल्या सपना चौधरीला तेथील आयोजकानेच लाखोंचा गंडा घालून फरार झाल्याचे उघडकीस आले आहे.

रविवारी 17 फेब्रुवारीला सपनाचा लुधियानातील पंजाब भवन येथे एक डान्स शो आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी सपनाला आयोजकांनी 8 लाक रुपये देण्याचे ठरवले होते. 6 लाख त्यांनी कार्यक्रमापूर्वी अॅडव्हान्स म्हणून दिले होते तर 2 लाख देण्याचे बाकी होते. पण कार्यक्रम झाल्यानंतर तो आयोजकच फरार झाला.

या संपूर्ण फसवणुकीच्या प्रकारानंतर सपना चौधरीच्या भावाने पोलिसांत या प्रकरणाची तक्रार दाखल  केली आहे. महत्त्वाचं म्हणजे जम्मू काश्मिरच्या पुलवामा येथील दहशतवाद्यांच्या हल्ल्यांत वीरमरण आलेल्या शहिदांच्या कुटुबियांना ही उर्वरीत रक्कम सपना देणगी म्हणून देणार होती, असे तिच्या भावाने म्हटले आहे.

https://www.instagram.com/p/Bt9Atv8FFmF/?utm_source=ig_embed

टाईम्स ऑफ इंडीयाच्या वृत्तानुसार पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार घेतली असून अद्याप तपास सुरु आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive