अक्षय कुमार आणि करण जोहरच्या बहुप्रतिक्षीत ‘केसरी'चा ट्रेलर येतोय 21 फेब्रुवारीला

By  
on  

अक्षय कुमार आणि परिनीती चोप्रा स्टारर केसरी सिनेमाच्या प्रदर्शनाची प्रेक्षकांमध्ये कमालीचा उत्सुकता आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेला आणि अनुराग सिंह दिग्दर्शित या ऐतिहासपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर येत्या गुरुवारी म्हणजेच 21 फेब्रुवारीला येत आहे.

‘केसरी' सिनेमा 1897 साली झालेल्या सारागढी युध्दावर आधारीत आहे. शीखांनी आपल्या कमी तुकडीच्या सैन्याच्या जोरावर हजारो अफगाणी सैनिकांना सळो की पळो करुन सोडलं होतं या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांना खूप भावते होते. या पोस्टरमधील अक्षयचा पगडी परिधान केलेला आणि  हातात तलवार असलेला लूक पाहायला मिळाला.

सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये मागच्या वर्षी जानेवारी 2018 मध्ये केसरीच्या शुटींगला सुरुवात झाली होती. पण अचानक या सेटला आग लागल्याने मग उर्वरीत शूटींग अक्षय कुमारआणि परिणीती चोप्रा हिने मुंबई फिल्म सिटीत पूर्ण केले.

 

https://youtu.be/q9In6sxMFDA

 

Glimpses of Kesari – Part ३ मध्ये व्हिडिओच्या सुरुवातीलाच २१ शिख हे  १०,००० अफगाणी सैनिकांसमोर उभे ठाकलेले दिसत आहेत. संख्येने शत्रुसैन्यापेक्षा कमी असूनही ईशर सिंगच्या चेह-यावर भितीचा लवलेशही दिसून येत नाही. मुंग्यांसारखे दिसणारं अफगाण सैन्य पुढे सरकताच ईशर सहका-यांना गोळी चालवण्याची आज्ञा देतो हे या व्हिडिओमधून दिसून येत आहे. हा सिनेमा १ मार्चला रसिकांच्या भेटीला येणार आहे.

 

https://youtu.be/R4h4Wcz-GtI

 

Recommended

Loading...
Share