By  
on  

‘स्टेपमॉम’ करीनाने सारा अली खानला दिला डेटिंगबाबत हा सल्ला

करीनाचं आणि सैफ-अमृताच्या दोन्ही मुलांचं उत्तम जमतं. इतकंच कशालाना सारानेही तिच्यात आणि करीनाच्यात उत्तम नातं असल्याचं कबूल केलं आहे. दोघीही अनेकदा एकत्र दिसतात. इतकंच कशाला करीनाही आणि सारा एकमेकिंच्या सख्ख्या मैत्रिणी असल्यासारखं वाटतात. फॅमिली फंक्शनमध्येही त्या एकत्र असतात. करीनाही साराला वेळोवेळी योग्य सल्ले देत असते. अलीकडेच करीनाने साराला डेटिंग करण्याबाबत सल्ला दिला आहे.

https://www.instagram.com/p/BuCCbYnnvSG/?utm_source=ig_web_copy_link

नुकतंच एका इंटरव्ह्युमध्ये साराला विचारलं गेलं की डेटिंगबाबतीत तू साराला कोणता सल्ला देऊ इच्छित आहेस. त्यावर करीनाने उत्तर दिलं की, मी साराला सांगेन पहिल्या सिनेमातील हिरोला कधीही डेट करू नकोस’. अर्थात साराचा पहिला सिनेमा होता ‘केदारनाथ’. त्यात तिचा हिरो होता सुशांतसिंग राजपुत. त्यामुळे करीनाने साराला अप्रत्यक्षरित्या सुशांतला डेट करू नकोस असाच सल्ला दिला आहे. अलीकडेच साराने तिला कार्तिक आर्यनला डेट करायचं असल्याचं जाहीर केलं होतं.

 

Recommended

PeepingMoon Exclusive