पाहा अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षीत 'केसरी'चा दमदार ट्रेलर

By  
on  

अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षीत 'केसरी'चा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा स्टारर केसरी सिनेमाच्या प्रदर्शनाची प्रेक्षकांमध्ये कमालीचा उत्सुकता होती. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेला आणि अनुराग सिंह दिग्दर्शित या ऐतिहासपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहात होते.

‘केसरी’ सिनेमा 1897 साली झालेल्या सारागढी युध्दावर आधारीत आहे. शीखांनी आपल्या मोजक्याच तुकडीच्या सैन्याच्या जोरावर हजारो अफगाणी सैनिकांना सळो की पळो करुन सोडलं होतं या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांना खूप भावते होते. या पोस्टरमधील अक्षयचा पगडी परिधान केलेला आणि  हातात तलवार असलेला लूक पाहायला मिळाला.

सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये मागच्या वर्षी जानेवारी 2018 मध्ये केसरीच्या शुटींगला सुरुवात झाली होती. पण अचानक या सेटला आग लागल्याने मग उर्वरीत शूटींग अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा यांनी मुंबईतील फिल्म सिटीत पूर्ण केलं.

 

https://youtu.be/JFP24D15_XM

Recommended

Loading...
Share