'नच बलिये'च्या आगामी सीझनमध्ये सलमान खान परिक्षकपदी होणार विराजमान?

By  
on  

'नच बलिये' हा डान्स रिएलिटी शो सर्वात जास्त प्रसिध्द आहे आणि याला कारणही तसंच आहे ते म्हणजे या शोमध्ये सेलिब्रिटी जोड्यांमध्ये जबरदस्त स्पर्धा रंगते. त्यामुळे सर्व डान्स शोमध्ये तो हटके ठरतो. आता या शोच्या सूत्रांकडून महत्तवाची बातमी हाती आलीय ती म्हणजे. बॉलिवूड दबंग सलमान खान या आगामी 9 व्या सीझनच्या परिक्षक पदी विराजमान होण्याची शक्यता आहे. ह्या शोच्या निर्मात्यांची यांसंदर्भात सलमानसोबत बातचितसुध्दा सुरु असून समजते.

सूत्रांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, येत्या काही महिन्यात नच बलिये हा प्रसिध्द शोचा आगामी सीझन लवकरच ऑन एअर करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. तसंच यासाठी काही सेलिब्रिटी जोड्या शॉर्ट लिस्टसुध्दा झाल्या आहेत तसंच  फक्त सलमानला ऑनबोर्ड आणण्याची तयारी सुरु आहे. तसंच या शोची सलमान खान आपल्या टेलिव्हिजन बॅनरअंतर्गत सहनिर्मिती करु शकतो अशीही एक चर्चा रंगली आहे.

सलमान खानची प्रोडक्शन कंपनी सध्या कपिल शर्मा शोसोबत काम करत असून अनेक प्रोजेक्ट्सवर त्याचं  काम सुरु आहे.

Recommended

Loading...
Share