By  
on  

बहुप्रतिक्षित ‘नोटबूक’चा ट्रेलर रिलीज, दिसली प्रनुतन आणि जहीरमधली रोमॅंटिक केमिस्ट्री

सलमान खान प्रॉडक्शनच्या बॅनर खाली बनत असलेल्या ‘नोटबूक’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये काश्मीरच्या सौंदर्याचं दर्शन घडत आहे. ‘नोटबूक’ २०१९मध्ये रिलीज होणारा रोमान्स-ड्रामा सिनेमा आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच काश्मीरचं मनोहारी सौंदर्य दिसून येतं. ट्रेलर रिलीज करण्यापूर्वी निर्मात्यांनी सहा मुलांसहित प्रनुतन आणि जहीर यांचा फोटो शेअर केला होता. नितीन कक्कड या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. व्यवसायाने वकिल असलेल्या प्रनुतनला अभिनयाची ओढ असल्याने तिने या क्षेत्रात येण्याचं ठरवलं. या सिनेमातील अभिनेता जहीर याला सिनेपार्श्वभूमी नाही तर प्रनुतनच्या मागे आजी नुतन, वडिल मोहनीश, आत्या काजोल अशी दर्जेदार कलाकारांची पार्श्वभूमी आहे. सलमान खान, मुराद खेतानी आणि अश्विन वर्दे हे या सिनेमाचे निर्माते आहेत. हा सिनेमा २९ मार्च २०१९ ला रसिकांच्या भेटीला येत आहे.

https://www.youtube.com/watch?time_continue=25&v=SXYxOCLc9-c

Recommended

PeepingMoon Exclusive