By  
on  

म्हणून बोनी कपूर करतायत श्रीदेवींच्या साडीचा लिलाव

बॉलिवूड चांदनी म्हणजेच दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी या वर्षभरापूर्वी अकस्मात आपल्यातून निघून गेल्या. सिनेसृष्टीसह चाहते आणि संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. 24 फेब्रुवारीला त्यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होत आहेत. श्रीदेवींच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे पती बोनी कपूर यांनी त्यांच्या आठवणीत काहीतरी खास करण्याचं ठरवलं आहे.

कपूर कुटुंबीयांनी श्रीदेवींच्या साडीचा ऑनलाइन लिलाव ठेवला आहे. हा लिलाव सुरू झाला असून आतापर्यंत या साडीला सव्वा लाखांपर्यंतची बोली लागली आहे. ही साऊथ इंडीयन कोटा प्रकारातील सहावारी साडी आहे. दक्षिण भारतात जनमलेल्या श्रीदेवींची ही साडी एकप्रकारची त्यांची ओळखच आहे.

१४ फेब्रुवारी रोजी कपूर कुटुंबीयांनी चेन्नईत खास पूजा ठेवली होती. त्यानंतर आता श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी श्रीदेवींच्या 'कोटा साडी'चा ऑनलाईन लिलाव ठेवला आहे. 40 हजारांपासून सुरु झालेली या साडीची बोली आत्ता सव्वा लाखांपर्यंत पोहचली आहे.

महत्त्त्वाचं म्हणजे या लिलावातून मिळणारी सर्व रक्कम कपूर कुटुंबिय हे निराधार महिला, वृध्द यांच्यासाठी काम करणा-या 'कन्सर्न इंडिया फाउंडेशन प्रोग्राम' या संस्थेला देणगी स्वरुपात देणार आहेत.

श्रीदेवींच्या कपडे आणि फॅशनचे नेहमीच सर्वत्र कौतुक होत असे. त्या नेहमीच स्टाईलीश राहण्याला पसंती द्यायच्या.

 

Recommended

PeepingMoon Exclusive