By  
on  

‘छपाक’च्या शुटिंगपुर्वी दीपिका भेटणार अ‍ॅसिड अ‍ॅटक सर्व्हायव्हर लक्ष्मी अगरवालला

दीपिकाने सध्या तिच्या आगामी ‘छ्पाक’ या सिनेमावर लक्ष केंद्रित केलं आहे.  दिपिका ‘छपाक’ या सिनेमातून निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. या सिनेमासाठी मेघना गुलजार तिची सहनिर्माती आहे. या सिनेमात दिपिका अ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्व्हाव्हर लक्ष्मी अगरवाल हिची भूमिका साकारत आहे. या सिनेमात विक्रांत मेस्सी दीपिकाच्या पतीची आलोक दीक्षितची भूमिका साकारत आहे.

राजी, तलवार सारख्या सिनेमांचं दिग्दर्शन करणारी मेघना या सिनेमाची दिग्दर्शिका आहे. या सिनेमासाठी लूक टेस्ट सुरु झाली आहे. मेघना म्हणते, ‘या सिनेमासाठी तयारी करणं ही माझ्यासाठी आणि दीपिकासाठी सगळ्यात कठीण परीक्षा आहे. शुटिंगच्या आधी मी दीपिका आणि विक्रांत लक्ष्मी अगरवाल आणि तिचे पती आलोक दीक्षित यांची भेट घेणार आहे. त्यामुळे आम्हाला लक्ष्मीचा खरा संघर्ष कसा होता हे जवळून पाहता येईल.’ लक्ष्मी अगरवाल हिच्यावर अ‍ॅसिड हल्ला झाला होता. पण या संकटासमोर हार न मानता लक्ष्मी अशा हल्ल्यांनी पीडित मुलींसोबत उभी राहिली.

Recommended

PeepingMoon Exclusive