By  
on  

अनुष्का शर्माचं अखेर हे स्वप्न होणार साकार

जशी सामान्यांची काही स्वप्नं असतात, तशी सेलिब्रिटींचीसुध्दा असतात. ती पूर्ण करण्यासाठी त्यांचीसुध्दा सतत धडपड सुरु असते. असंच एक स्वप्न बॉलिवूडची सौंदर्यवती गुणी अभिनेत्री अनुष्का शर्मा उराशी बाळगून होती. पण अनेक अडथळ्यांचा सामना करत ती आपल्या ध्येयापर्यंत पोहचू शकत नव्हती. पण अखेर आता तिचं स्वप्न पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर आहे. तुम्हालासुध्दा उत्सुकता असेल ना की नेमकं कोणतं स्वप्न अनुष्काने पाहिलंय. चला तर, मग जाणून घेऊयात.

अनुष्का शर्माला जनावरांसाठी अनेक वर्षांपासून आश्रय आणि रुग्णालय उभारायचं होतं. तिने आपली ही इच्छा व हे प्रोजेक्ट बद्दल काही वर्षांपूर्वीच वाढदिवसानिमित्त घोषणा केली होती. गेल्या तीन वर्षांपासून हे प्रोजेक्ट अडचणीत होते, पण अखेर ते आता मार्गी लागले आहे. शहापूर तालुक्यातील दाहागाव येथील अधिग्रहित कृषी भूमीवर हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. ठाणे कलेक्टर कार्यालयाकडून यासाठी संमती मिळाली आहे.

अवुष्काचे आई-वडील या संपूर्ण पशू रुग्णालयाची जबाबदारी सांभाळणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive