By  
on  

इम्तियाजने बना दी जोडी ! सारा आणि कार्तिक सिनेमात एकत्र झळकणार

सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खान हिने बॉलिवूडमध्ये केदारनाथ आणि सिंबा या सिनेमांमधून दमदार पदार्पण केलं आणि आता ती आपल्या परफॉर्मन्सच्या जोरावर इंडस्ट्रीत चांगलाच जम बसवू पाहते आहे. अनेक सिनेमांच्या ऑफर्स सध्या तिच्याकडे आहेत. पण पदार्पणापूर्वीच साराने वडील सैफ अली खान यांच्यासोबत खॉफी विथ करणमध्ये हजेरी लावली होती आणि तिथे करणच्या एका खट्याळ प्रश्नाला उत्तर दिल्यानंतर ती भलतीच चर्चेत आली. आपल्याला अभिनेता कार्तिक आर्यनसोबत कॉफी डेटवर जायला आवडेल असं साराने करणच्या शोमध्ये जगजाहीर केलं होतं. त्यानंतर प्रत्येक जण सारा आणि कार्तिकच्या कॉफी डेटसाठी उत्सुक होते.

सर्वांनाच सारा आणि कार्तिक कॉफी डेटवर जाणार असा प्रश्न पडला होता पण त्यापूर्वीच आता ही जोडी सिनेमानिमित्त एकत्र येत आहे. साराची इच्छा आता सिल्व्हर स्क्रीनवर पूर्ण होताना दिसतेय. प्रसिध्द दिग्दर्शक इम्तियाज अली सारा आणि कार्तिक या जोडीसोबत लवकरच एक सिनेमा घेऊन येतायत. ही एक लव्हस्टोरी असेल.  या सिनेमात या दोघांसोबत अभिनेता रणदीप हुड्डा पण असेल. रणदीप हुड्डा आणि इम्तियाज अली यांनी हायवे सिनेमा केला होता.

सूत्रांच्या माहितीनुसार, कार्तिक, सारा आणि रणदीप हुडा हे सिनेमाची स्क्रिप्ट वाचन करत असून लवकरच हा सिनेमा फ्लोअरवर जाणार आहे. कार्तिकला जेव्हा या सिनेमासंदर्भात विचारणा करण्यात ली तेव्हा तो म्हणाला, “ इम्तियाज सर माझे आवडते दिग्दर्शक आहेत आणि मी त्यांचा सिनेमात काम करतोय.”

 

दिनेश विजान आणि इम्तियाज अली या सिनेमाची निर्मिती करत असून हा लव आजकल 2 सिनेमा असेल अशी माहिती सूत्रांकडून समजतेय. लव आजकल हा सिनेमा 2009 साली प्रदर्शित झाला होता. ह्यात सैफ अली खान आणि दीपिका पादुकोण ही जोडी झळकली होती.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive