By  
on  

श्रद्धा कपूरला वाढदिवसादिवशी मिळालं अनोखं गिफ्ट, ‘साहो’ च्या टीमनं दिलं हे सरप्राईज

श्रद्धा कपूरचे सध्या दोन महत्त्वाचे सिनेमे जास्त चर्चेत आहेत. पहिला म्हणजे सायना नेहवालचा बायोपिक आणि दुसरा म्हणजे प्रभाससोबतचा साहो. प्रभाससोबतच्या साहोची चर्चा निर्मितीला सुरुवात झाल्यापासून होत आहे. आज श्रद्धाच्या वाढदिवसानिमित्त साहोच्या टीमनेही तिला एक हास सरप्राईज दिलं आहे. साहोच्या टीमने शेड्स ऑफ साहोचा चॅप्टर २ रिलीज केला आहे. या श्रद्धाचा खास अंदाज दिसून येत आहे.

या व्हिडिओची सुरुवातच धमाकेदार अ‍ॅक्शनने होत आहे. यात प्रभासही सुपर स्टायलिश लूकने होत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून साहोमध्ये अ‍ॅक्शनचं भांडार असणार आहे याची चुणूक मेकर्सनी दाखवली आहे.

https://www.youtube.com/watch?v=ZtwjxGnkeys

हा व्हिडिओ ट्वीट करताना निर्मात्यांनी कॅप्शन असं दिलं आहे की, ‘साहोच्या लीडिंग लेडीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तिच्या वाढदिवसानिमित्त शेड्स ऑफ साहोचा चॅप्टर २ सादर करत आहोत’. साहोमध्ये प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्याशिवाय नील नितिन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे यांच्यासारखे नामवंत कलाकार आहेत. हा सिनेमा अ‍ॅक्शनचा परिपूर्ण पॅकेज आहे यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive