By  
on  

कंगनाने तिच्या रिलेशनशीपविषयी केला खुलासा, जाणून घ्या काय म्हणते कंगना

कंगना राणावत हे नाव सिनेसृष्टीतील बलाढ्य नावापैकी एक आहे. कंगानाने बॉलिवूडमध्ये स्वत:चं असं एक वजन निर्माण केलं आहे. त्यामुळेच कंगना काहीही करो, माध्यमांचं लक्ष तिच्याकडे असतंच. याशिवाय अनेकदा स्फोटक वक्तव्य करण्यामध्येही कंगना आघाडीवर असते. यशाच्या शिखरावर असलेल्या कंगनाच्या रिल आयुष्यात अनेक हिरो असले तरी रिअल आयुष्यात कधी हिरो येणार याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिलेली असते.

https://www.instagram.com/p/BtaPnt9nyok/?utm_source=ig_web_copy_link

कंगना सध्या मणिकर्णिकाचं यश साजरं करत आहे. या दरम्यान दिल्लीमधील एका कार्यक्रमात तिने हे मान्य केलं की तिच्या आयुष्यात कोणीतरी आहे. कंगना म्हणते, ‘सध्या माझ्या आयुष्यात कोणीतरी आहे. आयुष्यात सध्या मला रेग्युलर डेटिंगची गरज वाटत नाही. मला असा सोबती हवाय जो मला कामात प्रेरणा देईल.’ कंगनाच्या या कबुलीनंतर तिचे चाहते मात्र चांगलेच गोंधळात पडले आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive