By  
on  

उधम सिंहच्या भूमिकेत इरफान खान नाही तर विकी कौशल झळकणार

विकी कौशलने इंडस्ट्रीत आता एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अल्पावधीतच त्याने रसिक प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवलं आहे. त्याचा 'उरी - द सर्जिकल स्ट्राईक' या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर लोकप्रियतेचे अनेक उच्चांक मोडले. या सिनेमामुळे विकीचा भाव भलताच वधारला आहे. त्याच्याकडे अनेक सिनेमांच्या ऑफर्स आहेत. नुकतीच एक महत्त्वाची बातमी म्हणजे अभिनेता विकी कौशल स्वातंत्र्य सेनानी उधम सिंह यांच्या बायोपिकमध्ये त्यांची प्रमुख भूमिका साकारणार आहे. शूजित सरकार दिग्दर्शीत या सिनेमात यापूर्वी अभिनेता इरफान खान प्रमुख भूमिकेत होता. पण त्याच्या जागी आता विकीची वर्णी लागली आहे.

विकीच्या निवडीबद्दल बोलताना शूजित सरकार म्हणाले, "पहिल्यापासूनच विकी हा सिनेमांच्या बाबतीत खुपच चोखंदळ असल्याचे पाहायला मिळालेय. तो सिनेमासाठी जीव ओतून काम करणारा अभिनेता आहे. त्यातूनच ह्या भूमिकेसाठी एका पंजाबी कलाकाराची आवश्यकता होती. म्हणून त्याची निवड योग्य ठरेल. हा सिनेमा एका पंजाबी स्वातंत्र्य सैनिकावर आधारित आहे."

पंजाबमधील जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला उधम सिंह यांनी घेतला होता. या पंजाबी स्वातंत्र्यसैनिकाची कथा या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive