By  
on  

'टू स्टेट्स'नंतर अमृता सिंह झळकणार या आगामी सिनेमात

अमृता सिंह ही बॉलिवूडमधील चतुरस्त्र अभिनेत्रींपैकी एक. हिंदी सिनेसृष्टीतील 70-80 चा काळ तिने आपल्या विविध भूमिकांव्दारे गाजवला. 2014 साली 'टू स्टेट्स' सिनेमामध्ये एक पंजाबी आई साकारल्यानंतर आता पुन्हा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी अमृता सज्ज झाली आहे. अमृता अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू स्टारर आगामी 'बदला' या क्राईम स्स्पेन्स थ्रीलर सिनेमात भूमिका साकारतेय. अमृता या सिनेमात असल्याने प्रेक्षकांच्या भुवया नक्कीच उंचावल्या असणार, सर्वांनाच तिच्या या भूमिकेविषयी प्रचंड उत्सुकता लागली आहे.

सुजॉय घोष दिग्दर्शित 'बदला' सिनेमाचे रहस्यमयी पोस्टर आणि उत्कंठावर्धक ट्रेलर पाहून प्रेक्षक सिनेमाची वाट पाहत आहेत. या सिनेमाचा महत्त्वपूर्ण भाग असलेली अमृता म्हणते," ब-याच काळानंतर अशी भूमिका मिळाली आहे. याद्वारे स्वत:च्या अभिनयाची ताकद दाखवून देण्याची ही चांगली संधी मला लाभली. माझं काम कसं झालंय हे तर प्रेक्षकच सिनेमा पाहून ठरवतील."

बॉलिवूड किंग शाहरुख खान हा ‘बदला’चा निर्माता आहे. त्याच्या रेड चिली एन्टरटेन्मेन्टने या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. बिग बी आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या अफलातून अभिनयाच्या जुगलबंदीचा 'पिंक'नंतर बदला हा सिनेमा येत्या 8 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

Recommended

PeepingMoon Exclusive