'बर्फ' या सिनेमात अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी एकत्र झळकणार

By  
on  

महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनय साकारण्याची संधी मिळालेल्या कलाकरांना त्याचं सोनं कसं करता येईल याकडे जास्त कल असतो. आत्तापर्यंत दीपिका पादुकोण, तापसी पन्नू, फरहान अख्तर यांनी बिग बींसोबत काम करुन त्यांना आपल्या अभिनयाचे पैलू दाखवून दिले आहेत. आता लवकरच ही संधी अभिनेता इम्रान हाश्मीला मिळतेय.

पिपींगमूनला मिळालेल्या वृत्तानुसार रूमी जाफरी दिग्दर्शित बर्फ या आगामी सिनेमानिमित्त अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी एकत्र येत आहेत. सूत्रांनुसार हा कोर्टरुम ड्रामा असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

Recommended

Share