By  
on  

या फोटोंमध्ये दिसतोय सोनाली बेंद्रेच्या चेह-यावरचा आत्मविश्वास, तुम्ही पाहिले का फोटो?

सुपरफिट सोनालीला हायग्रेड कॅन्सरचं निदान झाल्यावर सगळ्या बॉलिवूडला धक्का बसला होता. सोनालीच्या कुटुंबियांसाठी देखील हा मोठा धक्का होता. पण सोनाली यातून तरली ती तिच्या जिद्दीमूळे.

https://www.instagram.com/p/BuoRROUBqxD/?utm_source=ig_web_copy_link

१३ वर्षांच्या रणवीरला इथं सोडून उपचारासाठी अमेरिकेत गेली. पण इतक्या आजारातूनही आणि वेदनेतूनही सोनालीने चेह-यावरचं हास्य कायम ठेवलं. उपचार आणि सोनालीची जिद्द यामुळे तिला बरं होण्यास मदत मिळाली.  तिच्या या कॅन्सरच्या लढ्यात तिचे पती गोल्डी बहल यांची तिला खंबीर साथ लाभली. सोनालीने अलीकडेच एक फोटो शूट केलं आहे. या फोटोंमध्ये तिचा बाल्ड लूक दिसून येत आहे. पण या लूकमध्येही तिच्या चेह-यावरचं हास्य जराही लोपलं नाही.  सोनालीने हेअरबँड, पर्ल नेकलेस व स्वेट शर्ट कॅरी केला आहे.

https://www.instagram.com/p/BuqTpLhBBll/?utm_source=ig_web_copy_link

या हास्यामागे असलेला सोनालीचा संघर्षही तितकाच मोठा आहे. या आजारपणात ती अनेकदा निराशही झाली होती. आजारपणासाठी स्वत:ला दोषी मानायची पण मानसोपचार तज्ज्ञांच्या सहाय्याने ती या निराशेतून बाहेर पडली. सध्या तिच्या फोटोतून हाच आत्मविश्वास झळकत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive