By  
on  

सोनम कपूरने जान्हवीला वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा पाहा काय म्हणते सोनम

चुलत बहिण जान्हवी कपूरच्या वाढदिवसानिमित्त सोनम कपूरने एक जुना फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तुम्हाला शाळकरी सोनमच्या हातात लहानगी जान्हवी दिसेल. जान्हवी आज तिचा २२ वा वाढदिवस साजरा करत आहे. या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये सोनम म्हणते, ‘हॅपी बर्थडे बेबी जानू, माझी लाडकी बेबी गर्ल, तुझ्या चेह-यावर कायम हसू राहू दे’.

https://www.instagram.com/p/BupRhqHFypb/?utm_source=ig_web_copy_link

या फोटोत सोनमने केशरी रंगाचा टी शर्ट आणि जीन्स घातली आहे. तर अगदी काही महिन्यांच्या जान्हवीने पांढरा फ्रॉक घातला आहे. जान्हवी सध्या वाराणसीमध्ये वडिल बोनी कपूर आणि बहिण खुशी कपूर हिच्यासोबत आहे. जान्हवी करण जोहरच्या आगामी ‘तख्त’मध्ये दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/BuqAArBHCnv/?utm_source=ig_web_copy_link

 

Recommended

PeepingMoon Exclusive