By  
on  

अर्जुन कपूरसोबत ख्रिश्चन लग्न करण्याबाबत मलायकाने केला हा खुलासा

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यातील प्रेमप्रकरणाची आता सर्वांनाच माहिती आहे. या दोघांबद्दल दररोज नवनव्या बातम्या ऐकायला मिळतात.अनेकदा पार्टी किंवा डिनर डेटवर या लव्हबर्ड्सना कैदसुध्दा करण्यात येतं.अशीच एक उडती खबर काही दिवसांपूर्वी सूत्रांनी दिली होती, ती म्हणजे मलायका आणि अर्जुन येत्या एप्रिलमध्ये ख्रिश्चन पध्दतीने विवाहबध्द होणार आहेत. पण या ख्रिश्चन विवाहाबाबत प्रथमच मलायकाने प्रतिक्रीया दिली आहे.

एका मुलाखतीत खळखळून हसत मलायका म्हणते," माझं आणि अर्जुनचं लग्न ..ओह गॉड..हे सर्व मिडीयानेचं पेरलंय...अर्जुनबद्दलसुध्दा मिडीयाने अनेक बातम्या पसरवल्या आहेत.मी घटस्फोटानंतर एकटी अजिबात राहू शकत नव्हते. तसंच प्रत्येकाला रिलेशनशीपमध्ये राहायला आवडतं, तसंच मलासुध्दा आवडतं. जीवनात प्रत्येकाला पुढे जाऊन एक प्रेम करणारा जीवनसाथी हवा असतो जो आयुष्य प्रेमाने भरुन टाकेल."

अरबाजसोबत घटस्फोट घेण्याच्या निर्णयावर मलायका म्हणते," हा घटस्फटोाचा निर्णय घेताना मला अनेकांनी बजावलं होतं. की घटस्फोट हा पर्याय नाही. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होते आणि आत्ता या निर्णयाचा मला आनंदच होतोय."

Recommended

PeepingMoon Exclusive