By  
on  

या कारणासाठी रात्री उशीरा हॉस्पिटलमध्ये पोहचली प्रियांका चोप्रा

देसी गर्ल जेव्हापासून परदेशी सूनबाई झालीय तेव्हापासून ती सतत चर्चेत असते. भारत आणि यूएसए अशा तिच्या वा-या नेहमी सुरु असतात. नुकतीच ती भारतातलं आपलं शूटींग आणि आकाश अंबानीच्या बिग फॅट वेडींगला उपस्थित राहून पुन्हा युएसएसाठी रवाना झाली. पण तत्त्पूर्वी एका वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे.

त्याचं झालं असं की, प्रियांका 11 मार्चला यूएसएला जाण्यापूर्वी मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये आई मधु चोप्रा यांच्यासोबत गेली होती. काही दिवसांपूर्वीच प्रियांका प्रेग्नेंट असलेल्या बातम्या झळकल्या होत्या आणि आता तिची ही हॉस्पिटल भेट या गोड बातमीकडे तर वळत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतोय. पण दरम्यान, मिडीया रिपोर्ट्सनुसार प्रियांका हॉस्पिटलमध्ये आपल्या नातेवाईकाची भेट घेण्यासाठी गेली होती, असं कळतंय. पण आता नेमकं कोणतं कारण खरं, हे येणा-या काळात स्पष्ट होईलच.

Recommended

PeepingMoon Exclusive