By  
on  

आमिर खानचा आज वाढदिवसानिमित्त असा आहे,प्लॅन

बॉलिवूडमध्ये मि परफेक्शनिस्ट म्हणून मिरवणारा आमिर खान नेहमीच आपल्या सिनेमांमुळे आणि इतर सामाजिक भान जपल्यामुळे चर्चेत असतो. आज 14 मार्च हा आमिर खानचा वाढदिवस. यंदा आमिरचा 54 वा वाढदिवस आहे. पण वय वाढल्याच्या जराही खाणाखुणा त्याच्याकडे पाहून दिसत नाहीत. सर्वांनाच त्याचा वाढदिवस कसा साजरा होणार ह्याची उत्सुकता असेल. चाहत्यांना तर ते जाणून घ्यायला खुपच आवडेल.

आमिर खान सालाबादप्रमाणे वांद्रे येथील आपल्या घरी प्रसिध्दी माध्यमांसोबत केक कापून तो वाढदिवस साजरा करणार आहे. पण लगेचच तिथून तो नॉर्थ आर्यलंडसाठी रवाना होईल. तेथील बेलफास्ट फिल्म फेस्टिव्हलसाठी त्याला उपस्थित राहायचं आहे.

नेहमीच आपल्या सिनेमांमधून दर्जेदार अभिनय साकारत आमिर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आला आहे. त्याचा सिनेमा असो किंवा टेलिव्हिजन शो सत्यमेव जयते असो प्रेक्षकांना मात्र त्याला पडद्यावर पाहण्याची नेहमीत आतुरता असते. पिपींगमूनमराठीतर्फे आमिर खानला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!

Author

Recommended

PeepingMoon Exclusive