By  
on  

आमिर खानला साकारायची आहे शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा, वाढदिवसादिवशी केल जाहीर

अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या शिवाजी महाराजांचं आजही मराठी मनावर गारुड आहे. त्यामुळेच की काय सेलिब्रिटींनाही पडद्यावर महाराज साकारायचा मोह आवरत नाही. अलीकडेच अभिनेता रितेश देशमुखने महाराजांचा जीवनपट पडद्यावर साकारण्याचा मानस बोलून दाखवला आहे. पण आता बॉलिवूड कलाकारांनाही महाराजांची व्यक्तिरेखा साकारण्याची अनिवार इच्छा असल्याचं दिसून येत आहे. यातील एक नाव म्हणजे आमिर खान. आज आमिरचा ५४ वा वाढदिवस आहे. यावेळी पत्रकारांसोबत वाढदिवसाचं सेलिब्रेशन केल्यानंतर तो बोलत असताना ही इच्छा व्यक्त केली आहे. आमिरने वयाची पन्नाशी केव्हाच पार केली असली तरी आजही त्याच्या अभिनयातील जोश जराही कमी झालेला नाही. तो अजूनही कॉलेजकुमाराच्या भूमिकेत परफेक्ट फिट होऊ शकतो यात शंका नाही. विशेष म्हणजे आपला लूक महाराजांच्या लूकशी मिळता जूळता असल्याचं त्याचं मत आहे.

वाढदिवसाचं औचित्य साधून आमिरने त्याच्यालाल सिंह चढढाया सिनेमाची घोषणा केली आहे. या सिनेमाच्या शूटिंगला सप्टेंबरमध्ये सुरूवात होईल.  आता आमिरला शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेत रस वाटू लागला आहे. खरं तर बॉलिवूडमध्ये अजूनपर्यंत महाराजांच्या व्यक्तिरेखेवर सिनेमा बनलेला नाही. अजय देवगनचा ‘तानाजी’ हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यातून शिवाजी महाराजांचं दर्शन घडेल यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive