असे लोक खुप कमी असतील ज्यांना रोहित शेट्टी हे नाव माहीत नसेल. उत्तम निर्माता दिग्दर्शक अशी रोहितची ओळख आहे. याशिवाय रोहित एक उत्तम माणूस आहे. त्याच्या भोवती असलेलं यश किंवा प्रसिद्धी हा एका रात्रीचा खेळ नाही. त्यामागे त्याची अपार मेहनत आणि जिद्द आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त प्रवास जाणून घेऊ.
https://www.instagram.com/p/BsDWnGhhpuI/?utm_source=ig_web_copy_link
रोहीतचे वडिल एम बी शेट्टी यांच्या निधनानंतर घर चालवण्यासाठी पडेल ती कामं करायला सुरूवात केली. या कामांमध्ये अभिनेत्रीची साडी इस्त्री करण्यापासून ते टच अप करण्यापर्यंतच्या कामांचा समावेश होता.
त्यानंतर जवळपास दहा वर्षानी सहायक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ज़मीन या सिनेमातून त्याने दिग्दर्शनात पाऊल ठेवलं. हा प्रयत्न फारसा यशस्वी ठरला नाही. पण २०१०मध्ये आलेल्या गोलमाल फ़्रँचाईजीने त्याची वेगळी ओळख बनवली. त्यानंतर रोहितने एकामागोमाग हिट सिनेमे दिले. रोहितच्या सलग आठ चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर कमाईचा १०० कोटींचा आकडा पार केला आहे. असं यश मिळवणारा तो बॉलिवूडचा एकमेव दिग्दर्शक आहे. रोहितचे सिनेमे उत्तरोत्तर असच यश मिळवत राहोत. 'पीपिंगमून' कड़ून रोहित शेट्टीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !