By  
on  

वाढदिवसानिमित्त 'कलंक'च्या टीमकडून आलियाला मिळाली ही खास भेट

बॉलिवूडची छोटा पॅकेट पण बडा धमाका ह्याप्रमाणे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर गारूड करणारी गोड अभिनेत्री आलिया भटचा आज वाढदिवस आहे. तिचा यंदाचा वाढगिवस आणखी खास व्हावा म्हणून तिच्या आगामी 'कलंक' सिनेमाच्या टीमकडून करण जोहरने आलियाला एक खास भेट दिली. या सिनेमातील आलियाच्या या 'रुप'चं आणखी एक मनमोहक पोस्टर नुकतंच उलगडण्यात आलं आहे. नेहमी प्रमाणेच आलिया ह्यात खुप सुंदर दिसतेय.

करण जोहरने 'रुप'वती आलियाचं हे सुंदर पोस्टर सोशल मिडीयावर आज प्रदर्शित केलं. हा सिनेमा प्रेक्षकांच्येया 'कलंक' या मल्टिस्टारर सिनेमात आलिया प्रमुख व्यक्तिरेखा साकारतेय. माधुरी दीक्षित, संजय दत्त, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर आणि आलिया अशी तगडी स्टारकास्ट सिनेमात पाहायला मिळणार असून येत्या 19 एप्रिलला 'कलंक' प्रदर्शित होत आहे.

https://www.instagram.com/p/BvBNvu6Dxpa/?utm_source=ig_embed

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive