By  
on  

पुन्हा आधीच्याच उत्साहात सोनाली बेंद्रे दिसली या जाहिरातीत, आजारपणानंतर पहिली जाहिरात

सोनाली बेंद्रे जीवघेण्या कॅन्सरवर मात नुकतीच भारतात परतली आहे. अलीकडेच तिने एका मुलाखतीमध्ये आपल्या या लढाईचा अनुभव शेअर केला. तब्बल पाच महिने न्यूयॉर्कमध्ये उपचार घेतल्यानंतर ती भारतात परतल्याने सिनेसृष्टीसह तमाम चाहत्यांनासुध्दा खुप आनंद झाला. तिच्या या कॅन्सरच्या लढ्यात तिचे पती गोल्डी बहल यांची तिला खंबीर साथ लाभली.

https://www.instagram.com/p/Bu_vTEkhTxG/?utm_source=ig_web_copy_link

सोनालीने काही दिवसांपुर्वीच सेटवरुन एक फोटो शेअर केला होता. आता तिची जाहिरात समोर आली आहे. सोनालीने या जाहिरातीचा व्हिडीयो सोशल मिडियावर शेअर केला आहे. #मुझेसबनहीपता या हॅशटॅगसह हा व्हिडीयो तिने शेअर केला आहे. पिंक टॉप आणि शॉर्ट हेअरस्टाईल मधील सोनाली कॅमे-यासमोर तितकीच आत्मविश्वासपूर्ण दिसत आहे. सोनाली काही दिवसांपुर्वीच आकाश अंबानीच्या लग्नात दिसली होती. लाल ड्रेस घातलेली सोनाली खुप सुंदर दिसत होती. अलीकडेच तिने एक फ़ोटोशूटही केलं होतं.

https://www.instagram.com/p/Bu-t--9hJC1/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive