श्रेयस तळपदेच्या खांदयाला झाली दुखापत, या चित्रीकरणावेळी झाली दुखापत

By  
on  

श्रेयस तळपदे हा हरहुरी अभिनेता आहे. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक उत्तम व्यक्तिरेखा साकारण्याचा मानही त्याने मिळवला आहे. श्रेयस सध्या ‘माय नेम इज लखन’ या मलिकेत लखनची व्यक्तिरेखा साकारत आहे. या सिनेमातील एक दृश्य साकारताना श्रेयसच्या खांदयाला दुखापत झाली. त्यामुळे शूटिंग थांबवून त्याच्यावर उपचार केले गेले. त्याला विश्रांतीचाही सल्ला दिला गेला. पण कामाची कमिटमेंट असल्यामुळे त्याने शूटिंग सुरु ठेवलं. यातूनच त्याची कामाबद्दलचं समर्पण दिसून आलं. कॉमेडी, गंभीर अशा सगळ्याच भूमिका तो चांगल्याप्रकारे साकारू शकतो हे त्याने त्याच्या अभिनयातून सिद्ध केले आहे. आता तो प्रेक्षकांना लवकरच अश्विनी चौधरी यांच्या सेटलर्स या चित्रपटात दिसणार आहे

Recommended

Share