By  
on  

अजय देवगणच्या 'दे दे प्यार दे'चं हे धम्माल फर्स्ट लूक पोस्टर तुम्ही पाहिलंत का?

अजय देवगणच्या 'दे दे प्यार दे' या सिनेमाची चर्चा ब-याच दिवसांपासून सुरु होती. पिपींगमूनने यापूर्वी सांगितलं होतं, की अजयच्या 'दे दे प्यार दे' चं फर्स्ट लूक पोस्टर लवकरच उलगडणार आहे. त्यानुसार अजयने आज आपल्य़ा ट्विटरवरुन या सिनेमाचं धम्माल पोस्टर चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. अजयसोबतच या पोस्टरवर त्याच्या दोन लिडींग लेडीज म्हणजेच सिनेमाच्या नायिका तब्बू आणि राकुल प्रित यांना पाहायला मिळतंय. यावरुनच दोघींमध्ये फसलेल्या पुरुषाची ही विनोदी कथा सिनेमात साकारण्यात आल्याचं पोस्टरवरुन लक्षात येतंय.

पीपिंगमूनच्या वृत्तानुसार, अजय देवगणचा २ एप्रिलला ५० वाढदिवस आहे. या विशेष दिवसाचं औचित्य साधून आगामी ‘दे दे प्यार दे’ चा ट्रेलर रिलीज केला जाणार आहे. एका मोठ्या इव्हेंट्चं आयोजन करून हा दिवस साजरा केला जाणार आहे. हा सिनेमा एक रोमॅंटिक कॉमेडी सिनेमा आहे. अंकूर गर्ग या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. याशिवाय भूषण कुमार, लव रंजन, कृष्ण कुमार आणि अंकुर गर्ग हे या सिनेमाचे निर्माते आहे. हा सिनेमा १७ मे ला रिलीज होणार आहे.

https://twitter.com/ajaydevgn/status/1108937659425021952

Recommended

PeepingMoon Exclusive