By  
on  

ऐतिहासिक सिनेमा 'पानिपत'मध्ये बाजीराव पेशवा साकारतोय अर्जुन कपूर

मराठ्यांचा इतिहास रुपेरी पडद्यावर साकारणारा आगामी बिग बजेट ऐतिहासिक सिनेमा 'पानिपत'मध्ये अभिनेता अर्जुन कपूर एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारतोय अशी चर्चा अनेक दिवसांपासून होती, पण त्याची नेमकी भूमिका स्पष्ट होत नव्हती. प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर या सिनेमाचं दिग्दर्शन करतायत. अखेर त्याने त्यावरचा पडदा आता उलगडला आहे, अर्जून सिनेमात श्रीमंत बाजीराव पेशवे साकारतोय.

या भूमिकेबद्दल उत्साहाने बोलताना अर्जुन कपूर म्हणतो," आशुतोष सरांच्या मते ही भारदस्त भूमिका असल्याने ती योग्यवेळेस प्रेक्षकांसमोर येईल तेव्हा त्याचा आणखी चांगला प्रभाव पडेल. म्हणून मी अनेक दिवसांपासून माझ्या भूमिकेबद्दल मौन बाळगून होतो.

https://www.instagram.com/p/BujmIrvg0xB/

 

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानिपत'मध्ये अर्जुनसोबतच  संजय दत्त आणि करिती सॅनॉन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा ऐतिहासिक सिनेमा यंदा डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive