By  
on  

ही जोडी तुम्ही ओळखली का...ह्याचं खास कनेक्शन जाणून घ्या

मराठी सिनेसृष्टीतील हॅंडसम हंक आणि चॉकलेट बॉय असं बिरुद मिरवणारा अभिनेता सिध्दार्थ लवकरच स्टार प्रवाहवरील जिवलगा मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पण या मालिकेचं आणि सिध्दार्थचं आणखी एक कनेक्शन तुम्हाला माहितीय का..नाही ना... म्हणूनच सिध्दार्थने खुद्द आपल्या चाहत्यांसाठी इंस्टाग्रामवरुन फोटोसह  ते शेअर केलं आहे. सिध्दार्थने आपल्या आईसोबतचा हा सेल्फी पोस्ट करत म्हटलंय, रिअल लाईफ आई आपली रील लाईफ आई म्हणून पहिल्यांदाच साकारत असल्याचं त्याने सांगितलं आहे. 'जिवलगा' मालिकेनिमित्त सिध्दार्थची खरी आईच मालिकेतही त्याची आई आहे आणि यामुळे दोघंही प्रचंड खुश आहेत. त्यांचा तो आनंद गगनात मावेनासा झालाय.

सिध्दार्थची आई सीमा चांदेकर या मराठी सिनेमा आणि रंगभूमीवरील नामवंत अभिनेत्री आहेत. जिवलगा या स्टार प्रवाहवरील मालिकेत त्या आता सिध्दार्थसोबतच झळकणार आहेत.

https://www.instagram.com/p/BvYJWcqgpUt/?utm_source=ig_web_copy_link

स्वप्निल जोशी, सिध्दार्थ चांदेकर, अमृता खानविलकर आणि मधुरा देशपांडे स्टारर जीवलगा ही मालिका येत्या 8 एप्रिलपासून सोमवार ेत शनिवार रात्री 8.30 वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive