By  
on  

प्रेग्नन्सीच्या चर्चेवर ऐश्वर्या राय बच्चनने केला हा खुलासा

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि पती अभिषेक बच्चन काही दिवसांपूर्वीच गोव्यात सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते. नेहमीप्रमाणे प्रसिध्दी माध्यमांच्या कॅमे-यात ते कैद झाले आणि काही वेळातच त्यांचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला. ह्यात अभिषेकसोबत समुद्रकिना-यावर फिरतानाच्या फोटोत ऐश्वर्याचं पोट काहीसं पुढे दिसलं म्हणजेच तिचा 'बेबी बम्प' दिसला त्यामुळे ऐश्वर्या आता पुन्हा प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना एकच उधाण आलं.

काल दिवसभर ऐश्वर्याच्या प्रेग्नन्सीच्या चर्चांना उधाण आल्यानंतर,ऐश्वर्याच्या प्रवकक्त्यांकडून ह्याबाबत खुलासा करण्यात आला आहे. 'ऐश्वर्या प्रेग्नंट असल्याच्या चर्चांमध्ये काहीच तथ्य नाही. तिचा हा फोटो चुकीच्या अँगलनं क्लिक केल्यामुळे तिचं पोट बाहेर आल्यासारखं दिसतं आहे. परंतु, ती दुसऱ्यांदा प्रेग्नंट नाही.' हा कुलासा झाल्यानंतर सर्व चर्चांना पूर्णविाम मिळाला.

https://twitter.com/thegoaneveryday/status/1108648758902816769

तुम्हाला हे माहितच असेल की, ऐश्वर्या आणि अभिषेक  2007 साली विवाहबंधनात अडकले. तर 2011 मध्ये ऐश्वर्यानं आराध्याला जन्म दिला.

 

Recommended

PeepingMoon Exclusive