By  
on  

83’ च्या निर्मितीमध्ये कपिल ‘कन्ये’चाही सहभाग, आमिया देव घेतीये दिग्दर्शनाचे धडे

सध्या आणखी एका बायोपिकची चर्चा जोरात आहे तो म्हणजे 83. कबीर खान दिग्दर्शित या सिनेमात रणवीर सिंगची मुख्य भूमिका आहे. या सिनेमासाठी रणवीर कठोर मेहनत घेताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे या सिनेमात कपिल देव यांची मुलगी आमिया देव हिचाही अप्रत्यक्षरित्या सहभाग आहे. आमिया या सिनेमाची असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत आहे. मुंबई मिररच्या माहितीनुसार, आमियाला सिनेसृष्टीत करीअर करायचं आहे.

संदीप पाटील यांचे चिरंजीव चिराग पाटील यांनी ही माहिती दिली आहे. चिराग म्हणतो, ‘आमिया दिल्लीची आहे. ती रोज ट्रेनिंग सेशनला उपस्थित असतेच. शिवाय निर्मिती प्रक्रियेतही तिचा सहभाग असतोच. या सिनेमासाठी रणवीर आणि ऑनस्क्रीन टीम १० दिवसांसाठी धर्मशाला येथे रवाना होईल. त्यानंतर ही टीम १०० दिवसांसाठी लंडन आणि स्कॉटलंड येथेही शुटिंगसाठी जाणार आहे.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive