‘रंगीला गर्ल’ रंगली राजकारणाच्या रंगात, उर्मिला मांतोडकरचा काँग्रेसमध्ये प्रवेश

By  
on  

बॉलीवूडची रंगीला गर्ल उर्मिला मांतोडकर आता नव्या करीअरसाठी सिद्ध झाली आहे. उर्मिलाने काँग्रेस पक्षात प्रवेश करत राजकाराणातील करीअरची सुरुवात केली आहे. राजकीय पक्षांकडून निवडणूका आणि सेलिब्रिटी हे नवं समिकरण सध्या जुळवताना आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक पक्षाची सेलिब्रिटींना पक्षात खेचून आणण्याची जणू चढाओढच लागलीय. उर्मिलाचा काँग्रेस प्रवेश हा त्याचा परिपाक म्हणता येईल. उर्मिलाने आज राहुल गांधीकडून सत्कार स्विकारत काँग्रेस प्रवेशावर शिक्कामोर्तब केलं.

उर्मिला उत्तर मुंबईमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. सध्या या मतदार संघात भाजपचे गोपाळ शेट्टी हे विद्यमान खासदार आहेत. यंदाही गोपळ शेट्टीच ही जागा लढवणार आहेत. ही जागा मिळवण्यासाठी कॉंग्रेसने उर्मिलाला उभं करण्याची शक्कल लढवल्याचे बोलले जात आहे. आता गोपाळ शेट्टींचा अनुभव जिंकतो कि उर्मिलाचं ग्लॅमर हे लवकरच कळेल.

 

Recommended

Loading...
Share