By  
on  

सलमान खान लाँच करणारा बॉडीगार्ड शेराच्या मुलाला, सिनेमासाठी उत्तम पटकथेच्या शोधात

सलमान खान हे बॉलिवूडचं मातब्बर नाव आहेच याशिवाय अनेकांचा गॉडफादरही आहे. सलमानने आतापर्यंत हिमेश रेशमियापासून प्रनुतन बहलपर्यंत अनेकांना बॉलिवूडचं तिकीट दिलं आहे. सलमान आता आणखी एका व्यक्तीचा गॉडफादर बनणार आहे तो म्हणजे टायगर. हा टायगर म्हणजे सलमानचा बॉडीगार्ड शेराचा मुलगा आहे. सलमान टायगरला लाँच करणार आहेच याशिवाय त्याच्या पहिल्या वहिल्या सिनेमासाठी स्क्रिप्टच्या शोधातही आहे.

याबद्दल बोलताना सलमान म्हणतो, शेराच्या मुलाची टायगरची पदार्पणाची तयारी जोरात सुरु आहे. त्याला अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांनी आपल्या सिनेमात घेण्यास इच्छा दर्शवली आहे. पण शेराला वाटतं की त्याच्या मुलाच्या पहिल्या सिनेमाची स्क्रिप्ट मी निवडावी. त्यामुळे टायगरसाठी सर्वोत्तम अशा स्क्रिप्टचा शोध मी घेत आहे. २०१६मध्ये टायगरने ‘सुलतान’ या सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive