By  
on  

या कारणासाठी पुढे ढकलली आहे, पंतप्रधान मोदींच्या बायोपिकची रिलीज डेट

पतंप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकची देशभरात चर्चा आहे. या सिनेमात विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाच्या रिलीजवर स्टे आणण्यासाठीची यचिका रद्द केल्यानंतर या सिनेमाची रिलीज डेट बदलली आहे.  निवडणूक काळात हा सिनेमा रिलीज होत असल्याने याचा फायदा भाजपाला होईल अशी शंका असल्याने या सिनेमावर निवडणूक काळात बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली गेली होती.

या सिनेमाची रिलीज डेट ५ एप्रिल होती. पण वादामुळे ती पुढच्या आठवड्याची ठेवणार असल्याचं सुत्रांकडून समजलं आहे. पुढच्या आठवड्यातील ११ तारखेला हा सिनेमा रिलीज करण्याचा निर्मात्यांचा मानस असला तरी तो तडीस जाईल का याबाबत शंका आहे. या सिनेमाच्या रिलीज डेटबद्द्ल उमंग कुमार, संदीप सिंग किंवा विवेक ओबेरॉय यांच्यकडून कोणतंच स्पष्टीकरण आलं नसलं तरी अनेक मल्टीप्लेक्स चालकांनी त्यांच्या ५ एप्रिलच्या यादीत मोदींच्या बायोपिकचं नाव नसल्याचं म्हटलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive