‘हम आपके है कौन’च्या रिमेकमध्ये यांनी साकारावे प्रेम आणि निशा- माधुरी दीक्षित

By  
on  

राजश्री प्रॉडक्शनचा सुपरहिट फॅमिली सिनेमा म्हणजे ‘हम आपके है कौन’. या सिनेमाने प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली. याशिवाय सलमान आणि माधुरी ही सुपरहिट जोडी देखील बॉलिवूडला दिली. या सिनेमातील सलमान आणि माधुरी म्हणजेच प्रेम आणि निशाची अदकारी प्रेक्षक अजूनही विसरले नाहीत.

‘कलंक’च्या प्रमोशनवेळी माधुरीला विचारलं गेलं की, ‘हम आपके है कौन’मधील रिमेकबद्दल तिचं काय मत आहे, त्यावेळी ती म्हणते की, ‘रिमेकमध्ये कोण काम करणार हे त्यावेळच्या कथेवर अवलंबून असेल. ती कथाच या दोघांमधील केमिस्ट्री जास्त अधोरेखित करेल. माझ्यामते कोणीही ही व्यक्तिरेखा साकारू शकतो.’ माधुरीला आलिया आणि वरुणबद्दल विचारलं असता ती म्हणते, आलिया आणि वरुण अगदी सहजेतेने ही व्यक्तिरेखा साकारु शकतात. आलिया उत्तम अभिनेत्री आहे. ती कोणत्याही व्यक्तिरेखेला आपलंसं करू शकते. त्यामुळे ते देखील ही व्यक्तिरेखा उत्तम साकारू शकतात.

Recommended

Loading...
Share